Frequently asked Questions:
1. श्री खंडोबा लग्न निमंत्रण पूजा म्हणजे काय?
उत्तर: विवाहाचे शुभ निमंत्रण श्री खंडोबा महाराजांना अर्पण करण्यासाठी केली जाणारी पारंपरिक पूजा.
2. श्री खंडोबा तळी भंडार पूजा का केली जाते?
उत्तर: महाराजांचा आशीर्वाद, नवसपूर्ती आणि कुटुंबाच्या मंगलासाठी ही पूजा केली जाते.
3. श्री खंडोबा त्रिकाळ पूजा म्हणजे काय?
उत्तर: श्री खंडोबा भूपाळी पूजा,श्री खंडोबा धूप आरती,श्री खंडोबा शेज आरती,अशा तीन वेळा केली जाणारी विशेष पूजा.
4. श्री खंडोबा पंचामृत अभिषेक संकल्प पूजा कशी केली जाते?
उत्तर: पंचामृताने अभिषेक करून भक्ताच्या संकल्पानुसार विधीपूर्वक पूजा केली जाते.
5. श्री खंडोबा नैवेद्य पूजा म्हणजे काय?
उत्तर: श्री खंडोबा महाराजांना श्रद्धेने नैवेद्य अर्पण करून आशीर्वाद घेतला जातो.
6. श्री खंडोबा मानसन्मान पूजा कधी करावी?
उत्तर: विशेष प्रसंगी, नवसपूर्ती किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते.
7श्री खंडोबा जागरण-गोंधळ म्हणजे काय?
उत्तर: श्री खंडोबा महाराजांच्या भक्तीभावाने आयोजित केला जाणारा पारंपरिक धार्मिक विधी.
